Video : हरलीन देओलचे दोन सुपर-डुपर झेल तुम्ही पाहिलेत का?

Video : हरलीन देओलचे दोन सुपर-डुपर झेल तुम्ही पाहिलेत का?

भारतीय महिला संघ इंग्लंडसोबत टी २० पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव जरी झाला असला तरीदेखील भारताच्या हरलीन कौर देओलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. षटकार असलेल्या चेंडूला हरलीनने मैदानात खेचत इंग्लंडच्या खेळाडूला तंबूत धाडले. तिच्या या अनोख्या कॅचमुळे सर्वत्र हरलीनच्या नावाची सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने हरलीनच्या दोन सुपर डुपर कॅचचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला असून भरभरून दाद देखील मिळत आहे....

इंग्लंडच्या डावातील 19 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर हरलीन देओल सीमारेषेवर क्षेत्ररसक्षण करत होती. इंग्लंडची अ‍ॅमी जोन्स फलंदाजी करीत होती, तिने शिखा पांडेच्या चेंडूवर फटका खेळला आणि चेंडू सीमारेषा पार पाठवण्याचा प्रयत्न केला.

या चेंडूवर जोन्सला तंबूर परतावे लागेल असे कोणालाही वाटले नसेल, परंतु हरलीनने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केले ते आश्चर्यकारक होते. झेल पकडण्यासाठी पहिले हरलीनने हवेत झेप घेतली.

सीमारेषा अगदी जवळ असल्याने हरलीनने चेंडू सीमारेषेच्या आत हवेत फेकला व आपला तोल सांभाळण्यासाठी सीमारेषेपार उडी मारली.

यानंतर तिने सीमारेषेच्या बाहेर हवेत उडी मारत जबरदस्त कॅच पकडला. देओलचा हा झेल पाहून सर्वच चकित झाले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खेळमंत्र्यांसह अनेक दिग्गजांकडून दाद

केंद्रीय खेळमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन तेंडूलकर, आनंद महिंद्र यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर रीट्विट करत या कॅचचे कौतुक केले.

सोशल मीडियात सुपरवूमनची बाजी

आज दिवसभर हरलीनच्या अनोख्या कॅचची चर्चा रंगली होती. #HarleenDeol हा हॅशटॅग वापरून अनेकांनी मिम्सदेखील व्हायरल केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com