'या' तीन खेळाडूंना अहमदाबादने केले 'करारबद्ध'

'या' तीन खेळाडूंना अहमदाबादने केले 'करारबद्ध'

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२२ (IPL 2022) चा मेगा लिलाव (mega auction) अवघ्या २४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या मेगा लिलावापूर्वी अहमदाबाद (Ahmedabad या संघाने आयपीएलसाठी शुभमन गील (Shubhman Gill), रशीद खान (Rashid Khan) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या तीन धुरंदर खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे....

याशिवाय आशिष नेहरा (Ashish Nehara), गेरी क्रस्टेन (gary kirsten) अहमदाबाद संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग असणार आहेत. आयपीएल १५ मध्ये अहमदाबाद स्पर्धेचा नवीन संघ असणार आहे. त्यांना लिलावापूर्वी ३ खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवण्याचा अधिकार आहे.

क्रस्टेन, आशिष नेहरा यांच्यासोबत इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोळंकीला (Vikram Solanki) संघ संचालक (Team Director) म्हणून संघात संधी देण्यात आली आहे. अहमदाबाद संघाची मालकी सीव्हीसी कॅपिटल्सकडे (CVC Capitals) असणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद आणि लखनौ या नवीन संघाना २२ जानेवारीपर्यंत त्यांनी आपल्या संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर करायची आहेत. अहमदाबाद संघाने रशीद खान आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी १५ कोटी तर तिसरा खेळाडू शुभमन गिलला प्रत्येकी ७ कोटी इतकी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत २०१५-२०२१ पर्यंत हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. तर शुभमन गील कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे. तर रशीद खानने सनराईझर्स हैद्राबाद संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. २०१५ साली मुंबई इंडियन्सने हार्दिकला खरेदी केलं होतं.

सलिल परांजपे नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com