महान फिरकीपटू हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा

२३ वर्षाच्या कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा
महान फिरकीपटू हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा

मुंबई | Mumbai

भारतीय संघाचा महान फिरकीपटू हरभजन सिंग याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्याने एक पोस्ट शेअर करत. याबाबत माहिती दिली.

'सर्व चांगल्या गोष्टींचा कधीतरी शेवट होतो. मी आज मला सर्व काही देणाऱ्या खेळाला अलविदा करत आहे. हा २३ वर्षांचा मोठा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करण्यात मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासू आभार.' असे ट्विट हरभजनने केले आहे.

हरभजन सिंगने १७ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलिया सारख्या त्या काळात तगड्या समजल्या जाणाऱ्या संघाविरुद्ध मार्च १९९८ मध्ये बंगळुरुमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकिर्दित १०३ कसोटी ४१७ कसोटी विकेट घेतल्या आहेत.

कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. हरभजनने (Harbhajan Singh) २३६ एकदिवसीय सामने खेळले असून त्याच्या नावावर २६९ विकेट्स आहेत. याचबरोबर त्याने भारताकडून २८ टी २० सामने खेळत २५ विकेट्स घेतल्या आहेत.

हरभजन सिंग (harbhajan singh) हा २००७ च्या टी २० वर्ल्डकप आणि २०११ एकदिवसीय संघाचा देखील भाग होता. हरभजन सिंग २००१ च्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रकाशझोतात आला होता. मायदेशात झालेल्या या कसोटी मालिकेत त्याने आपल्या फिरकीने सर्वांना प्रभावित केले होते. याच मालिकेतील दुसऱ्या कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com