गुजरातचा विजयी रथ हैद्राबाद रोखणार का? आजच्या सामन्याकडे आयपीएल प्रेमींचे लक्ष

गुजरातचा विजयी रथ हैद्राबाद रोखणार का? आजच्या सामन्याकडे आयपीएल प्रेमींचे लक्ष
Gujrat Vs Hydrabad

मुंबई | Mumbai

आयपीएल १५ (IPL 15) मध्ये आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) सायंकाळी ७:३० वाजता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध सनराईझर्स हैद्राबाद (Sun risers Hyderabad) यांच्यात सामना होणार आहे. आयपीएल गुणतालिकेत गुजरात १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आपलं अव्वल स्थान परत मिळवण्यासाठी गुजरात आज हैद्राबादविरुद्ध प्रयत्न करणार आहे....

हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळणारा गुजरात टायटन्स आजच्या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. साखळी सामन्यात डीवाय पाटील (DY Patil) येथे झालेल्या पहिल्या लढतीत हैद्राबादने गुजरातला नमवले होते.

आता गुजरातवर पुन्हा एकदा मात करण्यासाठी हैद्राबाद मागील विजयाने आत्मविश्वास दुणावलेला हैद्राबाद विजयी षटकार मारण्यासाठी आज सज्ज असणार आहे. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी गुजरात नव्या रणनीतीने मैदानात उतरणार आहे.

या सामन्यात हार्दिक पंड्याच्या सर्वोत्तम फलंदाजीवर सर्व आयपीएल चाहत्यांचे लक्ष असणार आहे. हैद्राबाद संघाचा कर्णधार केन विलियम्सच्या नेतृत्वात हैद्राबाद संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर आतापर्यंत झालेल्या सामन्यात दमदार प्रदर्शन केलं आहे.

मात्र, हैद्राबाद संघाला आज मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. यासाठी कर्णधार केन विलियम्सन , राहुल त्रिपाठी , अभिषेक शर्मा , निकोलस पुरण यांच्याकडून चांगली कामगिरी संघाला अपेक्षित असणार आहे.

केन विलियम्सनच्या हैद्राबादविरुद्ध झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात गुजरात संघाची आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरली होती. त्यामुळे शुभमन गील , मॅथ्यू वेड , साई सुदर्शन, अभिनव मनोहर यांच्याकडून संघाला चांगली कामगिरी अपेक्षित असणार आहे.

गत सामन्यात सुमार फलंदाजीमुळे गुजरात संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता .

संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या फॉर्मात आहे याशिवाय शुभमन गील , डेविड मिलर यांनी आतापर्यंत झालेल्या सामन्यात सर्वाधिक २०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत मोहंमद शमी , लौकी फेर्गसन रशीद खान यांनी आपल्या गोलंदाजीतून आतापर्यंत झालेल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे.

स्टार प्लेअर्स : शुभमन गील , डेविड मिलर , हार्दिक पंड्या , केन विलियम्सन , राहुल त्रिपाठी .

सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.