IPL 2022, GT vs PBKS : पंजाब किंग्ज पाचव्या विजयासाठी सज्ज

IPL 2022, GT vs PBKS : पंजाब किंग्ज पाचव्या विजयासाठी सज्ज
File Photo

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) मंगळवारी गुजरात टायटन्स (gujarat titans) विरुद्ध पंजाब किंग्ज (Gujarat Titans) यांच्यात डीवाय पाटील मुंबई येथे सायंकाळी ७:३० वाजता सामना होणार आहे. गुजरात संघ आयपीएल (IPL) गुणतालिकेत ९ सामन्यांमध्ये ८ विजय आणि १ पराभवासह १६ गुणांनी अव्वल स्थानी आहे...

गुजरात टायटन्स संघाने ८ विजयांसह बाद फेरीतील आपलं स्थान पक्के केलं आहे आजच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपला नववा विजय संपादन करून आपलं अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याचा गुजरातचा (GT) मानस असणार आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्ज (PBKS) संघासाठी बाद फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास गुजरात संघाचं पारडं विजयासाठी मजबूत मानलं जात आहे आजच्या सामन्यात मयंक अगरवाल, शिखर धवन, हार्दिक पंड्या, डेविड मिलर हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.