IPL 2022 : गुजरात-मुंबई आज भिडणार, सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष

IPL 2022 : गुजरात-मुंबई आज भिडणार, सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष
File Photo

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज शुक्रवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा सामना ५ वेळचा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता मुंबईच्या सीसीआय ब्रेबॉर्न मैदानावर होणार आहे. मुंबई इंडियन्स संघाचे ९ सामन्यांमध्ये ८ पराभव आणि १ विजयासह २ गुण आहेत....

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) डीवाय पाटील क्रिकेट मैदानावरील मिळालेल्या विजयाने आत्मविश्वास उंचावलेला मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा धक्का देण्यासाठी उत्सुक आहे.

तर पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध झालेल्या पराभवामुळे आत्मविश्वास गमावलेला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, डेविड मिलर, हार्दिक पंड्या हे स्टार प्लेअर्स असतील.

सलील परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.