आयपीएलमध्ये आज डबल धमाका; 'हे' संघ आमनेसामने

आयपीएलमध्ये आज डबल धमाका; 'हे' संघ आमनेसामने

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज दोन डबल हेडर सामने रंगणार आहेत. पहिला सामना दुपारी ३:३० वाजता मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सलग पाचवा सामना जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा (Royal Challengers Bangalore) सामना करणार आहे.....

आयपीएलमध्ये आज डबल धमाका; 'हे' संघ आमनेसामने
Visual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

बंगळुरवर मात करून गुणतालिकेत आपलं अव्वल स्थान अधिक मजबूत करण्याचा गुजरातचा मानस असणार आहे. बंगळूरची नजर विजयी षटकारावर लागली आहे. आजच्या सामन्यात फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, शुभमन गील हे स्टार प्लेअर्स असतील.

मुंबई-राजस्थान दुसरा सामना

आयपीएलमध्ये (IPL) आज शनिवारी दुसरा सामना ५ वेळचा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना डीवाय पाटील मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. सलग ८ सामने गमावल्यामुळे मुंबई इंडियन्स बाद फेरीच्या शर्यतीतून बाद झाला आहे.

आयपीएलमध्ये आज डबल धमाका; 'हे' संघ आमनेसामने
मॅक्सवेलची वेडिंग पार्टी : विराटचा 'पुष्पा' डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधील (IPL) आपला पहिला विजय मिळवून आयपीएलमधील विजयी गोड शेवट करण्यासाठी मुबई इंडियन्स (MI) सज्ज असणार आहे. तर मुंबईवर विजय मिळवून स्पर्धेतील आपला सातवा विजय संपादन करून अव्वल २ संघांमध्ये आपलं स्थान पक्के करण्यासाठी राजस्थान रॉयल्स (RR) सज्ज आहे. आजच्या सामन्यात संजू सॅमसन, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, रोहित शर्मा हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.