अदितीच्या गौरवार्थ गोल्फ गुणवत्ता शोधमोहीम

Tokyo Olympics/Golfer Aditi Ashok
Tokyo Olympics/Golfer Aditi Ashok

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नुकत्याच टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) 4 था क्रमांक मिळविणारी भारताची खेळाडू अदिती अशोक (Aditi Ashok) हिच्या उतुंग कामगिरीच्या गौरवार्थ रिव्हर साइड गोल्फ कोर्स, गोल्फ असोसिएशन नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर साईड गोल्फ कोर्स, निफाड, येथे दि. 13, 14 आणि 15 ऑगस्ट, 2021 दरम्यान गोल्फ (Golf) या खेळासाठी गुणवत्ता शोधमोहीम प्रक्रिया आणि शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे...

यामध्ये 6 ते 10 वर्षे मुले-मुली, 11 ते 15 वर्षे मुले- मुली आणि 16 ते 20 वर्षे मुले- मुली असे तीन वयोगट असणार आहेत. या सहा गटातून प्रत्येकी 20 -20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

या निवड झालेल्या खेळाडूंना रिव्हर साईड गोल्फ कोर्स, निफाड (Riverside Golf Course, niphad) येथे पुढील वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरामध्ये गोल्फचे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.

नुकत्याच टोकियो येथे पार पडलेल्या 32 व्या ऑलीम्पिकमध्ये भारताची गोल्फ खेळाडू आदिती अशोक हिने आपल्यापेक्षा कितीतरी सरस असलेल्या जागतिक दर्जाच्या पदक विजेत्या खेळाडूंना मागे टाकून 4 था क्रमांक मिळविला आहे.

तिच्या या गुणवत्तेचे गौरव व्हावे यासाठीच या गुणवत्ता शोध मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आपल्या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही आदिती सारखा खेळ करून गोल्फमध्ये प्रावीण्य मिळवावे, हा या उपक्रमामागील हेतु आहे.

या निवड प्रक्रियेत जास्तीत जास्त खेळाडूनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक (Ravindra Naik), रिव्हर साईड गोल्फ कोर्सचे चीफ प्रमोटर विंग कमांडर प्रदीप बागमार, गोल्फ असोसिएशन जिल्हा नाशिकचे सचिव नितीन हिंगमिरे, खजिनदार राजीव देशपांडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com