आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत नाशिकच्या देविशा व तनिष्काला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत नाशिकच्या देविशा व तनिष्काला सुवर्णपदक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंग्लंड येथील केंट शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप २०२३’ या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत देविशा व तनिष्का भुजबळ यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतासाठी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...

देविशा व तनिष्का या दोघीही माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मुली आहेत. त्या भुजबळ नॉलेज सिटी एमईटी मुंबई या विद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. इंग्लडच्या मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे १३ ते १८ फेब्रुवारीमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ३८ देशातील ५६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत नाशिकच्या देविशा व तनिष्काला सुवर्णपदक
जेट एअरवेजपासून ते भोंग्यांपर्यंत...; सोनू निगम 'या' वादांमुळे नेहमीच राहिला चर्चेत

या स्पर्धेत भारताचे १२ स्पर्धक विविध वयोगटात आणि वेगवेगळ्या धनुष्य प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेत देविशा पंकज भुजबळ हिने १९ वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्का पंकज भुजबळ हिने १७ वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात १ सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्जवल केले आहे.भारतीय संघ हा फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या स्पर्धेचे उदघाटन मिडवे केंट च्या महापौर जेन अल्डोस आणि टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव मुरे यांच्या हस्ते पार पडले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com