कोहलीसारखी व्यक्ती तरुणांसाठी आदर्श नाही; गंभीरचा बाण

कोहलीसारखी व्यक्ती तरुणांसाठी आदर्श नाही; गंभीरचा बाण

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारत (IND) आणि दक्षिण आफ्रिका (SA) यांच्या झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने डीन एल्गरला आऊट न दिल्याने संताप व्यक्त केला…

आर. अश्विनने (R. ashwin) गोलंदाची करत असताना त्याने टाकलेला चेंडू डीन एल्गरच्या पॅडला लागला. यावेळी अम्पायरने आउट दिले असता आफ्रिकेच्या कर्णधाराने डीएसआरचा निर्णय घेतला. यावर कोहली चांगलाच संतापल्याचे दिसून आले. कोहलीच्या या संतापावर माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गंभीर म्हणाला की, विराट कोहली खूप अपरिपक्व आहे. भारतीय कर्णधारासाठी स्टम्पवर बोलणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. असा कॅप्टन तरुणांसाठी कधीही आदर्श बनू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com