टीम इंडियाचा बॅट्समन ते पश्चिम बंगालचा राज्यमंत्री

क्रिकेटपटू मनोज तिवारी झाला क्रीडामंत्री
टीम इंडियाचा बॅट्समन ते पश्चिम बंगालचा राज्यमंत्री

कोलकाता | Kolkata

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी निवडून आलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीं याला विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते.

मूळचा प्रतापगडचा रहिवासी असलेला मनोज तिवारीने आपल्या वयाच्या ३५ व्या वर्षी हावडाच्या शिवपूर मतदारसंघात तब्बल ३२ हजार मतांनी विजय मिळवून थेट विधानसभेत आपला प्रवेश निश्चित केला.

सोमवारी ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून मनोज तिवारीचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज तिवारी आपल्या पत्नीसोबत टीएमसीमध्ये दाखल झाला होता.

भारतीय जनता पक्ष लोकांमध्ये फूट पाडून निवडणूक विजयासाठी प्रयत्न करीत आहे असा आरोप त्याने केला होता. जोरदार निवडणुकीच्या प्रचाराच्या बळावर त्याने निवडणुकीत बाजी मारली. आणि त्यामुळेच त्याला राज्यमंत्रीपद देण्यात आले. सध्या तो आपल्या परिवारासोबत कोलकाता येथे वास्तव्य करत आहे.

मनोज तिवारीने टीम इंडियासाठी १२ एकदिवसीय आणि ३ टी २० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावले आहे. १०४ हा त्याचा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक स्कोर आहे. त्याने आयपीएलमध्ये ९८ सामने खेळले असून , त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स , रायझिंग पुणे सुपरजायंटस आणि पंजाबकिंग्ज या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

आयपीएल सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत एकूण १६७५ धावा केल्या आहेत. ७५ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. २००६-०७ च्या रणजी हंगामात त्याने बंगाल संघाचे प्रातिनिधीत्व करताना ९९. ५० च्या सरासरीने ७९६ धावा काढल्या होत्या. या कामगिरीच्या बळावर त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. शिवाय बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघामध्ये संधी देण्यात आली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com