फुटबॉलचा थरार : स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, स्विझर्लंडकडून विजयी सुरुवात

फुटबॉलचा थरार : स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, स्विझर्लंडकडून विजयी सुरुवात

आनंद खरे, क्रीडा समीक्षक

22 व्या विश्वचषकाच्या स्पर्धेतील अर्जेंटिना आणि जर्मनी या दोन मोठ्या विश्वविजेत्यांच्या पराभवामुळे चकित झालेल्या फुटबॉल चाहत्यांना काल फ्रान्स, स्पेन या विश्वविजेत्यांच्या विजयामुळे दिलासा मिळाला. तसेच गेल्या 2018 च्या तिसर्‍या क्रमांकाच्या बेल्जियमने सहा दशकांनंतर विश्वचषकामध्ये सहभागी झालेल्या कॅनडाला पराभूत करून आपले विजयी अभियान सुरू केले. तर आजच्या पहिल्या सामन्यात स्विझर्लंडने अटीतटीच्या सामन्यात धोकादायक असलेल्या कॅमेरूनला एक गोलच्या फरकाने पराभूत करून आपला पहिला विजय साजरा केला.

स्पेनचा मोठा विजय - इ गटातील सामन्यात चारवेळा जर्मनीला जपानने धक्का दिल्यामुळे याच गटात असलेल्या स्पेनच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष होते. या सामन्यात स्पेनने सरस खेळ करून कोस्टारिकावर सात गोलची सरबत्ती करून आपला मोठा विजय साजरा केला.

फ्रान्सचे चार गोल - फ्रान्सने अशियाना-ओशियाना गटातून संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलियावर 4-1 असा विजय मिळवला. परंतु या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी घेऊन धक्का देण्याचे प्रयत्न केले होते. परंतु त्यानंतर फ्रान्सने वेगळी रणनीती आखून चार गोल करून विजय साजरा केला.

स्विझर्लंडचा विजय तर कोरिया- उरुग्वे बरोबरी - एचफ गटातील सामन्यात स्विझर्लंडने अटीतटीच्या सामन्यात धोकादायक कॅमेरूनला एक गोलने पराभूत करून विजय साजरा केला. अनुभवी एक्सर्डन शकिरीने दिलेल्या पासवर पहिला विश्वचषक खेळणार्‍या ब्रील इबोलाने आपला पहिला गोल करून स्विझर्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

या गटात बलाढ्य ब्राझील असल्यामुळे स्विझर्लंडचा हा विजय त्यांना बाद फेरीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे हे निश्चित.

एचफ या शेवटच्या आठव्या गटामध्ये खेळल्या गेलेल्या ऊरुग्वे-दक्षिण कोरिया या सामन्यात स्टार खेळाडू लुईस सुआरेसला थोपण्यात दक्षिण कोरियाने यश मिळवले, तर आक्रमणामध्ये कोरियाच्या हेवेन्ग हुई जो, को जुई कोंग, जुग वू याँग यांनी जोरदार हल्ले करून उलटफेर करण्याचे चांगले प्रयत्न केले.

परंतु त्यांना आक्रमणाचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. उरुग्वेचा दुसरा स्टार एडिसन कवानीला 70 व्या मिनिटाला मैदानात उतवरले. त्याने आपल्या अनुभवाच्या आधारे काही हल्ले केले परंतु कोरियाचा गोली किम सोंग गोऊंने वेळोवळी सुंदर गोलरक्षण केले. या बरोबरीमुळे आता या दोन्ही संघांना बाद फेरीसाठी सामान संधी असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com