फुटबॉलचा थरार : मेसीच्या अर्जेंटिनाला जीवदान

फुटबॉलचा थरार : मेसीच्या अर्जेंटिनाला जीवदान

आनंद खरे, क्रीडा समीक्षक

22व्या फिफा विशवचषक( FIFA World Cup-2022 ) स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये चांगलेच उलटफेर बघायला मिळाल्यानंतर राऊंड ऑफ 16 च्या आठ सामन्यात मोरोक्कोचा उलटफेर वगळता नेदरलँड, इंग्लंड, अर्जेटिना, फ्रांस, ब्राझील आणि पोर्तुगाल या या दिग्गज संघानी आपल्या खेळामध्ये सातत्य राखत विजय मिळवत बाद फेरीचा पहिला अडथळा दूर केला होता. तर गत 2018 च्या उपविजेत्या क्रोएशियाला जपानविरुद्ध पेनल्टीने शूट आऊट ने तारले.

कारण या स्पर्धेत जपानने आपल्या गटात जर्मनी आणि स्पेन या दोन विश्वविजेत्यांना पराभवाचा धक्का देत पहिल्या क्रमांकाने बाद फेरीत प्रवेश केला होता. जपानची ही कामगिरी बघता राऊंड फो 16 च्या या सामन्यात क्रोएशियावरही अशी वेळ येते की काय अशी स्थिती होती. कारण या सामन्यात जपानने पहिला गोल करून चांगली सुरवात करून क्रोएशियावर दबाव टाकला होता. परंतु क्रोएशियाच्या पेरिसिकने गोल करून 1-1 बरोंबरी साधल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.

या सामन्याच्या निर्धारीत वेळेत आणि 15-15 मिनिटाच्या अतिरिक्त वेळेसही ही बरोबरी कायम राहिल्यामुळे शेवटी पेनल्टी शूट आऊट मध्ये गेलेल्या या सामन्यात क्रोएशियाकडून गोली डोमिनिक लिवकोव्हिकने तीन गोल अडवून मोलाची कामगिरी केली, तर क्रोएशियाच्या व्लासीच, ब्रॉझोव्हिआणि पासॉली यांनी शांत डोक्याने पेनल्टी किक मारून जपानच्या गोलीला चकवत आपले पहिल्या आठ मध्ये स्थान पक्के केले होते. तर आजच्या पहिल्या चारस्थानासाठीच्या पहिल्याच सामन्यतः क्रोएशियाला पेनल्टी शूट आऊटनेच पुन्हा साथ दिली.

ब्राझीलअनपेक्षित स्पर्धेबाहेर

काल खेळल्या गेलेल्या ब्राझील - क्रोएशिया या पहिल्या उपउपांत्य सामन्यात क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ब्राझीलचे पारडे जास्तच वजनदार होते. ब्राझीलचा स्टार नेमार आणि त्याचे साथीदार रिचर्डसन, व्हेनिसेस ज्युनियर, कासीमीरो, लुकास पेक्वेटो. थिएगो सिल्वा यांनी सुरवातीपासून चांगल्या चाली रचून आक्रमणामध्ये सातत्य राखले आणि अनेक वेळा क्रोशियाच्या गोलमध्ये धडकी मारून गोल करण्याचे प्रयत्न केले. या आक्रमणामुळे बॉल बर्‍याच वेळ क्रोएशियाच्याच्या हाफमध्येच होता. परंतु क्रोशियाचा गोली डॉमिनिक लिव्हेकोव्हिकने प्रत्येक वेळा चांगला बचाव करून क्रोएशियाचे होप्स जिवंत ठेवले, तर 2018 चा हिरो लुका मॉड्रिक आणि ऑर्सिक, माजेव्ही , एन . व्लासीच यांनी संधी मिळेल तेव्हा प्रती हल्ल्यात चांगले प्रयत्न केले.

तीनच दिवसापूर्वी जपानविरुद्ध मैदानात 120 पेक्षाही जास्त वेळ आपले मैदान गाजवणार्‍या क्रोएशियाच्या खेळाडूंनी थकवा असूनही पुन्हा तसाच खेळ करून ब्राझीलच्या आक्रमणाला थोपवून धरण्यात यश मिळविले. यामुळे निर्धारित वेळेत गोल दिसला नाही. नेमारच्या या आघाडीमुळे विजय पक्का असे वाटत असतांना क्रोएशियाच्या ब्रुपॅथोविकने प्रतिहल्ल्यात सुंदर गोल करून बरोबरी केल्यामुळे क्रोएशियाला नवी उमेद मिळाली. क्रोएशियाच्या बचावपटूंनी पुन्हा ब्राझीलचे हल्ले परतवून लावत हा सामनाही पेनल्टी शूट आऊट पर्यंत खेचला. या मेलोड्रामामध्ये क्रोएशियाचा गोली डोमिनिक लिवकोव्हिकने पुन्हा धावून आला. आणि ब्राझीलच्या पेड्रो आणि रॉगरीगो या भरवशाच्या खेळाडूंनी निराशा केली.

अर्जेंटिनाला दिलासा

अर्जेंटीना - नेदरलँड या दक्षिण आफ्रिकन अर्जेंटिना आणि युरोपचा डच - नेदरलँड यांच्यात खेळला गेलेला सामना या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सामना म्हणावा लागेल. मार्को व्हॅन बॅस्टेन, रीड गुलीट, रॉबिन व्हॅन पर्सी, अर्जेन रॉबेन अश्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या संघाला तीन वेळा उपविजेतेपद मिळवून दिले आहे तर तीन वेळा तिसरा क्रमांकही मिळवून दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com