फुटबॉलचा थरार : अर्जेंटिना- नेदरलँड, ब्राझील- क्रोएशिया लढाई

फुटबॉलचा थरार : अर्जेंटिना- नेदरलँड, ब्राझील- क्रोएशिया लढाई

आनंद खरे, क्रीडा समीक्षक

22व्या फिफा विशवचषक स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये चांगलेच उलटफेर बघायला मिळाल्यानंतर राऊंड ऑफ 16 मध्ये काही चमत्कार दिसून येतात का याची सर्वांना उत्सुकता होती. या राऊंड ऑफ 16 चे आठ सामने पार पडले. साखळी मधील अनपेक्षित निकाल समोर असल्यामुळे या आठ सामन्यामध्ये दिग्गज संघानी कोणतीही रिस्क न घेता खेळ केला.

नेदरलँड, इंग्लंड, अर्जेटिना, फ्रांस, ब्राझील आणि पोर्तुगाल यांनी आपले सर्वस्व पणाला लावून सुरवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत दबाव टाकला आणि आपले विजय साजरे केले. तर क्रोएशियाला पेनटी शूट आउटने तारले आहे. राऊंड ऑफ 16 च्या शेवटच्या सामन्यात मोरोक्कोकडून उलटफेर बघायला मिळाला. पोर्तुगालकडून पेपे, रॅफेएल गुररेइरोने आणि रेफाईल लेओने यांनी प्रत्येकी एक गोल करून पोर्तुगालला मोठा विजय मिळवून दिला आहे.

अर्जेंटिना- नेदरलँड सामना मेस्सीसाठी परीक्षा - दक्षिण अमेरिका खंडाचा अर्जेंटिना आणि युरोपचा नेदरलँड यांच्यात खेळल्या जाणार्‍या पहिल्या उपउपांत्य सामन्याची चर्चा रंगू लागली आहे. अर्जेंटानाला या स्पर्धेतही फेवरेट मानले जात आहे. मॅराडोनाच्याचा दर्जाचा लियोनेल मेस्सीने गेल्या चार विश्वचषकमध्ये प्रत्येक वेळी अर्जेंटिनाला आशेचा किरण दाखवला आहे. परंतु या चार विश्वचषकामध्ये 2014 च्या ब्राझील येथे झालेल्या 20 व्या विश्वचषकमध्ये अर्जेंटिनाला अंतिम लढतीत जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मेस्सीचे विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही.

त्यामुळे या अखेरच्या विश्वचषकामध्ये हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेस्सी जोमाने प्रयत्न करत आहे. तर नेदरलँड संघाचा ग्राफ बघितल्यास नेदर्लंडला विश्वचषकने तीन वेळा हुलकावणी दिली आहे त्यामुळे नेदर्लंडला 1974. 1978 आणि 2010 या तीन विश्वचषकमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तर 2014 ला यजमान ब्राझीलला पराभूत करून तिसरा क्रमांक मिळविला आहे तर 1998ला चवथा क्रमांक मिळविला आहे.

ब्राझीलचे पारडे जड मात्र सावधानता आवश्यक- पाच वेळा विश्वचषक उंचावणार्‍या ब्राझील सांबांचा खेळ सर्वांना भुरळ घालतो. फुटबॉलचा देव पेले, त्यानंतरचे रोनाल्डो, रोनाल्डिनो, काका अशी अनेक नांवे डोळ्यासमोर येतात. या विश्वचषकमध्ये ब्राझील नेमारवर विसंबुन आहे. दुखापतीमुळे दोन सामने खेळू न शकलेल्या नेमारची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

तर राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात नेमारने वापसी करून संघात चैतन्य आणले आणि साखळीमध्ये उलटफेर करणार्‍या कोरियाला 3-1 असे पराभूत केले आहे. 2018 च्या विश्वचषकाचा उपविजेता क्रोएशीयाने संघर्ष करून पहिल्या आठमध्ये प्रवेश मिळविला आहे. साखळीमध्ये क्रोएशीयाचा एक सामना बरोबरीत गेला. तर राऊंड ऑफ 16 च्या लढतीत जपानने जेरीस आणले. मात्र 1-1 बरोबरीमुळे पेनल्टीमध्ये गेलेल्या सामन्यात क्रोएशीयाला पेनल्टीने तारले. त्यामुळे या सामन्यात क्रोएशीयाचा हिरो लुका मॉड्रिकचा संघ ऑल टाईम फेवरेट ब्राझीलला कशी लढत देतो याची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com