पहिले इको-फ्रेंडली स्टेडियम विश्वचषक हॉकी सामन्यांसाठी सज्ज

पहिले इको-फ्रेंडली स्टेडियम विश्वचषक हॉकी सामन्यांसाठी सज्ज

राउरकेला । वृत्तसंस्था Rourkela

ओडिशाच्या राउरकेला (Rourkela, Odisha )येथे बनवलेले देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम (The largest hockey stadium in the country )13 जानेवारीपासून विश्वचषक हॉकी सामन्यांसाठी सज्ज झाले आहे. 15 एकरमध्ये पसरलेले हे स्टेडियम जगातील पहिले इको-फ्रेंडली हॉकी स्टेडियम आहे.

दि.13-29 जानेवारीदरम्यान हे सामने खेळविले जाणार आहेत. राउरकेला येथे 44 पैकी 20 सामने खेळवले जाणार आहेत तर अंतिम फेरीसह उर्वरित 24 सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर खेळवले जातील.

13 जानेवारी रोजी भारताचा स्पेन विरुद्ध पहिला सामना येथे होणार आहे. दोन दिवसांनंतर याच मैदानावर भारताची इंग्लंडशी लढत होणार आहे.

हे स्टेडियम बिजू पटनायक युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या आवारात 146.5 कोटी रुपये खर्चून विक्रमी 15 महिन्यांत बांधले गेले. फेब्रुवारी 2021 मध्ये मुख्यमंत्र्यांनी पायाभरणी केली आणि ऑगस्ट 2021 मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली.स्टेडियममध्ये 20,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.

जवळपास 3,600 टन स्ट्रक्चरल स्टील आणि 4,000 टन टीएमटी स्टील बांधकामात वापरण्यात आले आहे आणि प्रत्येक सीटची रचना अखंड दृश्य देण्यासाठी केली आहे आणि प्रेक्षकांना जगातील इतर कोणत्याही स्टेडियमपेक्षा खेळपट्टीच्या जवळ बसता येते. स्टेडियममध्ये अत्याधुनिक सुविधा, चेंजिंग रूम आणि सराव खेळपट्टीला जोडणारा एक बोगदा आणि फिटनेस सेंटर आणि हायड्रो-थेरपी पूल, सर्व काही अगदी जवळ आहे.

225 4-स्टार श्रेणीतील खोल्या देखील विकसित करण्यात आल्या आहेत आणि त्या स्पर्धेच्या कालावधीसाठी ताज समूहाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com