
नाशिक | सलिल परांजपे Nashik
आयपीएल स्पर्धेच्या सोळाव्या हंगामाचे अंतिम वेळापत्रक काही वेळापूर्वी बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. ३१ मार्च २०२३ ते २८ मे २०२३ पर्यंत ७४ सामन्यांचा थरार आयपीएल चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स संघांमध्ये होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर होणार आहे.
स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. यंदाच्या हंगामाचे आयोजन १२ वेगवेगळ्या व्हेन्यूनवर करण्यात आले आहे . साखळीत प्रत्येक संघाचे १४ सामने होणार आहेत यंदाच्या हंगामात १८ डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. दुपारचे सामने ३:३० आणि सायंकाळचे सामने ७:३० वाजता होतील.
आयपीएल स्पर्धेतील एक हजारावा (१०००) सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स ह्या सर्वाधिक यशस्वी व प्रसिद्ध संघांमध्ये चेन्नई येथे होणार आहे. ५८ दिवसात ७४ सामने होतील मुंबई चेन्नई संघांमध्ये यंदाही २ साखळी सामने होणार आहेत.
अव्वल ४ संघाना बाद फेरीत स्थान निश्चित करता येईल १ एप्रिल रोजी पंजाबकिंग्ज केकेआर आणि लखनऊ दिल्ली असा डबल हेडर रंगेल. मुंबई इंडियन्स संघाचा सलामी सामना २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाशी होईल. लीग सामन्यांमध्ये ७ सामने घरच्या मैदानावर आणि ७ सामने प्रतिस्पर्धी संघाच्या होम पीचवर होतील.