
दिल्ली | Delhi
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे. जगभरातील फुटबॉलप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे.
विश्वचषक विजेतेपदासाठी फ्रान्स आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार मानले जात होते आणि दोघांनीही अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. फ्रान्स सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यामागून एक पाऊल दूर आहे, तर अर्जेंटिनाच्या संघाला जगज्जेता होण्याची संधी आहे.
फ्रान्सच्या विजयाची जबाबदारी स्टार स्ट्रायकर कीलियन एम्बाप्पे आणि ओलिवर जिरूड या खेळाडूंच्या खांद्यावर असेल. त्याचवेळी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी अंतिम सामना जिंकून विजेतेपदासह विश्वचषकातून निरोप घेऊ इच्छितो, त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार आहे.