FIFA World Cup-2022 : फ्रान्स-अर्जेंंटीनामध्ये आज अंतिम लढत

FIFA World Cup-2022 : फ्रान्स-अर्जेंंटीनामध्ये आज अंतिम लढत

दोहा । वृत्तसंस्था Doha

यंदाच्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल (FIFA World Cup-2022 )स्पर्धेची अंतिम लढत गतविजेता फ्रान्स आणि लिओनेल मेस्सीची अर्जेंटिना या संघात होणार आहे. आज या जगज्जेतेपदाच्या लढतीचा थरार रंगणार आहे.

कतारच्या लुसैल स्टेडीयमवर अंतिम लढत रंगणार असून या थराराला आता अवघे काही तास उरलेले असतानाच फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघांमधील खेळाडू आणि त्यांचा अद्वितीय खेळ पाहता नेमकं जेतेपद कुणाला मिळणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली.

आपल्या देशाला जगज्जेतेपद मिळवून देण्याचा प्रत्येक संघातील खेळाडूंचा प्रयत्नही आहे. किंबहुना त्यासाठीच ही मंडळी प्रयत्नशील आहेत. फ्रान्सचा आक्रमक खेळ वरचढ ठरणार की पुन्हा एकदा मेस्सी नावाचा जादूगार संघाच्या मदतीने जगज्जेतेपद मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com