
आनंद खरे, क्रीडा समीक्षक
कतारच्या या २२ व्या विश्वचषक फूटबॉल स्पर्धेमध्ये सुरवातीपासूनच धक्कादायक निकाल बघायला मिळाले. मात्र उपांत्य फेरी मध्ये दिग्गज अर्जेंटिनाने क्रोएशियाला तर फ्रान्सने धक्कादायक निकालांची नोंद करणाऱ्या अफ्रिकन मोरोक्को संघाला पराभूत करून या उलटफेर ला लगामी घातला. आज खेळल्या गेलेल्या या फायनल मध्ये या दोन दिग्गज संघामधील घमासान मध्ये पहिल्या सत्रात अर्जेंटनाच्या बाजूने झुकलेल्या या सामन्यात उत्तार्धात कलाटणी मिळाली आणि पूर्वार्धात २-० अश्या फरकाने आघाडीवर असलेल्या अर्जेंटनाने दुसऱ्या सत्रातही पहिल्या दहा मिनिटामध्ये फ्रान्सवर वर्चस्व राखण्यात यश मिळविले.
पहिल्या सत्रात डी मारियाने डाव्या बाजूने केलेल्या गोलच्या प्रयत्नात फ्रान्सकडून बचावाच्या चूक झाल्यामुळे मिळालेल्या पेनल्टीवर मेस्सीने आपल्या शैलीत गोल करून १-० आशु आघाडी मिळविली. त्यानंतर ३५ व्या मिनिटाला पुन्हाअर्जेंटनाने केलेल्या प्रति हल्ल्यात मेस्सीने आपल्या मैदानातून दिलेल्या पासचा ताबा घेत अर्जेंटनाच्या फर्नांडेज आणि अल्व्हरेजने चाल करून बॉल दि मारियाकडे दिला. यावर डी मारियाने गोल करून अर्जेंटिनाची आघाडी २-० ने वाढवली. आघाडीवर असलेल्या अर्जेंटनाने दुसऱ्या सत्रातही पहिल्या दहा मिनिटामध्ये फ्रान्सवर वर्चस्व राखण्यात यश मिळविले.
परंतु दुसऱ्या सत्राच्या ७९ व्या मिनिटाला या सामन्यांना कलाटणी मिळाली आणि फ्रान्सकडून चाल करणाऱ्या खेळाडूला अडवल्यामुळे मिळालेल्या पेनल्टीने या सामन्याचे चित्रच बदलले. ७० मिनिटापर्यंत थोपवून धरलेल्या कैलान मेंम्बापेला पेनल्टीची संधी मिळाली. आणि त्याने पेनल्टीवर गोल करून फ्रान्सच्या गोटात अशा निर्माण केली. त्यानंतर पुन्हा केलेल्या हल्ल्यात मेंम्बापेने गोल करून २-२- अशी बरोबरी साधली. अतिरिक्त १५-१५ मिनिटांच्या या सत्रात पहिल्या १५ मिनिटात अर्जेंटीनानाने चांगले प्रयत्न केले परंतु त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही.
दुसऱ्या १५ मिनिटांच्या सत्रात ११० व्या मिनीटाला मात्र जोरदार हल्ल्यात गोलसमोरच्या झटापटीमध्ये मेस्सीने संधी साधली आणि गोल करून ३-२ अशी आघाडी मिळविली. परंतु पुन्हा फ्रान्सच्या प्रति हल्यात मेम्बापेचा हल्ला थोपवण्यात अर्जेंटिनाच्या बचावपटूंचा हॅन्ड झाल्यामुळे मिळालेल्या पेनल्टीवर मेम्बापेने गोल करून ३-३ बरोबरी केली. या गोलबरोबर मेम्बापेने हॅट्रिक केली. या बरोबरीमुळे सामना पेनल्टी शूट आऊट मध्ये गेला.
पेनल्टी शूट आऊट मध्ये विश्वविजेता - पेनल्टी शूट आऊट मध्ये अर्जेंटनाच्या चारही खेळाडूंनी पेनल्टी वर गोल करून फ्रान्सला ४-३ असे पराभूत करून या विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या नावे केले. या विजयामुळे मेस्सीचे स्वप्नही साकार झाले.
क्रोएशीयाचा तिसरा क्रमांक
सलग दुसऱ्या विश्वचषकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या लुका मॉड्रिंकच्या क्रोएशिया संघाला या विश्व चषकामध्ये उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तर या स्पर्धेत एखादा नाही तर चार-पाच चमत्कार करणाऱ्या मोरोककोंला गत २०१८ च्या विश्वविजेत्या फ्रांसने उपांत्य फेरीमध्ये पराभूत करून त्यांचा विजयी रथ थोपवला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यासाठी खेळवण्यात आलेलें या दोन संघांच्या लढतीत क्रोएशियाने बाजी मारली. या सामन्यात पूर्वार्धातच टन गोल बघायला मिळाले. क्रोएशीयाचा बचाव पटू जोस्को गव्हरडीऑलने सातव्या मिनिटाला गोल करून १-० अशी आघाडी घेतली परंतु दोन मिनीटानंतर मोरोककोंच्या अश्रफ दारीने गोल करून १-१ बरोबरी साधली. त्यानंतर ४२ व्या मिनीटाला मिसलाव्ह ओरसिस ने दूसरा गोल करून आघाडी घेतली . या एकमव आघाडीच्या आधारे गेल्या वेळच्या उपविजेत्या तिसरा क्रमांक मिळवून विजयी सांगता केली.