उर्वरित आयपीएलमध्ये इंग्लडचे खेळाडू नसणार?

उर्वरित आयपीएलमध्ये इंग्लडचे खेळाडू नसणार?

मुंबई | Mumbai

इंग्लंड संघाचा येत्या जून महिन्यापासून भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे या कालावधीत आयपीएल स्पर्धेच्या १४ व्या हंगामाच्या ३१ लढतीचे वेळापत्रक नव्याने तयार करण्यात आल्यास आयपीएलमध्ये इंग्लंडचे खेळाडू आपला सहभाग नोंदवू शकणार नाहीत, असे ईसीबीचे संचालक ऍशली जाईल्स यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लिश क्रिकेटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना आपले प्राधान्य दर्शवले आहे.

जाईल्स म्हणाले की, आम्ही इंग्लंडच्या पुढील सामन्यांमध्ये सर्व खेळाडूंना आमच्या संघामध्ये सहभागी करून घेण्याचा वीचार करत आहोत. आम्हला संपूर्ण वेळापत्रक प्राप्त झाले आहे.

त्या वेळापत्रकानुसार आम्हाला येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध मालिका खेळायची आहे. त्यामुळे आमचे सर्व खेळाडू या मालिकांमध्ये आपला सहभाग नोंदवतील.

बीसीसीआय सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांच्या आयोजनासाठी विंडो शोधत असून , सप्टेंबरमधे इंग्लंड बांगलादेश दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्याआधी मायदेशात भारताविरुद्ध ऑगस्टमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध मालिका पार पडल्यानंतर भारतात किंवा यूएईत होणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी इंग्लड संघाचे खेळाडू स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवतील.

नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या ऍशेस मालिकेत खेळातील. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत ज्या संघामध्ये सर्वाधिक इंग्लंडचे खेळाडू असतील. त्या संघाना याचा सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

-सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com