भारतविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

भारतविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

नॉटिंगहॅम | Nottingham

भारतविरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला (Test Series) ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम (Nottingham) येथे सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने आपल्या १७ सदस्सीय संघाची घोषणा केली आहे...

हा संघ केवळ पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी असणार आहे. संघाचे कर्णधारपद ज्यो रुटकडे (Joe Root) कायम ठेवण्यात आले आहे.

क्रिस वोक्स (Chris Woakes) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हे संघाचे प्रमुख गोलंदाज सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध उर्वरीत कसोटी सामन्यांमध्येदेखील त्यांचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे.

इंग्लंड संघाने आपल्या १७ सदस्सीय चमूत हसीब हमीद (Haseeb Hameed) आणि ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) या युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप (Icc World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळल्या गेलेल्या २ सामन्यांच्या मालिकेत ओली रॉबिन्सन याने इंग्लंड संघाचे प्रातिनिधित्व केले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामने अनुक्रमे, लीड्स, लंडन, नॉटिंगहॅम, लंडन आणि मँचेस्टर या मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत. सामन्याचे थेट प्रक्षेपण दुपारी ३:३० वाजता सोनी सीक्स, सोनी टेन १,२,३,४ या वाहिनीवर करण्यात येणार आहे.

सोनी सीक्स, सोनी टेन १, २ वाहिनीवर इंग्रजी समालोचन तर, टेन ३ वर हिंदी आणि टेन ४ वाहिनीवर तामिळ आणि तेलगू भाषेत समालोचन करण्यात येणार आहे.

इंग्लंड संघ

ज्यो रूट, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जॉनी बेरस्टो, डॉम बीस, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रावली, हसीब हमीद, सॅम करण, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली रॉबिन्सन, ओली पोप, डॉम सिबली, मार्क वूड, बेन स्ट्रोक्स.

सलिल परांजपे, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com