इंग्लंड-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका २७ जानेवारीपासून

इंग्लंड-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका २७ जानेवारीपासून

नवी दिल्ली | New Delhi

आयसीसीतर्फे (ICC) येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात ५० षटकांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. २०२३ या वर्षाची सुरुवात क्रिकेट चाहत्यांसाठी दणक्यात झाली आहे...

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील एकदिवसीय मालिका आटोपल्यावर आता २७ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (South Africa vs England) संघांमधील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला दक्षिण आफ्रिकेत सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये टी २० वर्ल्डकप स्पर्धेवर आपलं दुसऱ्यांदा नाव कोरल्यानंतर इंग्लंड संघाने आपला मोर्चा आता ५० षटकांच्या वर्ल्डकप स्पर्धेकडे वळवला आहे. इंग्लंड संघाने २०१९ मध्ये मायदेशात झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकप स्पर्धेवर ऑईन मॉर्गनच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर सुपर ओव्हरमध्ये १ धावेने थरारक विजय संपादन करून विश्वचषक स्पर्धेवर पहिल्यांदा नावं कोरून इतिहास रचला होता.

इंग्लंड-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका २७ जानेवारीपासून
कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

आता जोस बटलरच्या नेतृत्वात विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद कायम राखण्यासाठी इंग्लंड संघ २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे.

तर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद टेम्बा बाऊमाकडे असणार आहे. दोन्ही संघाना मालिकेची विजयी सुरुवात करण्याची संधी आहे. मालिका २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे पहिले २ सामने ब्लोमफॉन्टेन मॅनगॉग ओव्हल येथे होणार आहे.

इंग्लंड-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका २७ जानेवारीपासून
भुसावळमध्ये भूकंपाचे धक्के, परिसरात भीतीचे वातावरण

तर अखेरचा सामना किम्ब्ले डायमंड ओव्हल मैदानावर होणार आहे मालिकेच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाचा आनंद सर्व प्रेक्षकांना सोनी स्पोर्ट्स वाहिनीवर घेता येणार आहे. मालिकेचे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० आणि सायंकाळी ४:३० वाजता खेळवण्यात येणार आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com