पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडच्या नव्या संघाची घोषणा

पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडच्या नव्या संघाची घोषणा

कार्डिफ | Cardiff

इंग्लंडच्या (England) मर्यादित षटकांच्या संघातील तीन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील ४ जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळून आले. पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सुरु होणाऱ्या मालिकेसाठी इंग्लंड संघाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे...

इंग्लंड संघाला पाकिस्तानविरुद्ध ३ एकदिवसीय (one day matches) आणि ३ टी २० (T-20) सामन्यांची मालिका (Series) खेळायची आहे.

श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्टलमध्ये (Bristol) झालेल्या सामन्यानंतर सर्व इंग्लंडच्या खेळाडूंची नव्याने कोरोना चाचणी करण्यात आली. संपूर्ण सदस्य विलगीकरणात होते, अशी माहिती ईसीबीने (ECB) स्पष्ट केली आहे.

आगामी पाकिस्तानविरुद्ध सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाचे नेतृत्व अष्टपैलू बेन स्ट्रोक्सच्या (Ben Strokes) खांदयावर सोपवण्यात आले आहे. नव्या संघात ९ नवीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. जे प्रथमच मुख्य संघाकडून खेळतील.

नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेदरम्यान रजेवर गेलेल्या संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड (Chris Silverwood) यांचे पुनरागमन झाले आहे. इंग्लंड संघातील सर्व मुख्य खेळाडू १६ जुलैपासून सुरु होणाऱ्या टी २० मालिकेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकतील.

ईसीबीचे सीईओ टॉम हॅरिसन (Tom Harrison) म्हणाले की, कोरोनाची चाचणी सकारात्मक आढळून आलेल्या खेळाडूंमध्ये कोणतीही प्रमुख लक्षणे आढळून आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे, ही चांगली बाब आहे.

इंग्लंडचा नवीन संघ

बेन स्ट्रोक्स (कर्णधार), जॅक बॉल, डॅनी ब्रिग्स, ब्रायडेन कर्सी, झॅक क्रावली, बेन डकेत, लेविस ग्रेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, शाकिब महमूद डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, मॅट पार्किन्सन,डेविड पेन, फील स्लॉट, जॉन सिम्प्सन, जेम्स विन्स.

पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, अब्दुल्ला शफिक, आगा सलमान, फहीम अश्रफ, फकर झमान, हरिस रौफ, हैदर अली, हरीस सोहेल, हसन अली, मोहंमद हस्नेन, सर्फराझ अहमद, मोहंमद रिझवान, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी, सोहेब मकसूद, उस्मान कादिर.

सलिल परांजपे, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com