ICC T20 World Cup : इंग्लंड, विंडीज आज भिडणार

ICC T20 World Cup : इंग्लंड, विंडीज आज भिडणार

दुबई | Dubai

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ चा (ICC T20 World Cup 2021) दुसरा सामना आज दुबईच्या मैदानावर दोन वेळचा वर्ल्डकप विजेता वेस्ट इंडीज (West Indies) आणि २०१० चा वर्ल्डकप विजेता इंग्लंड (England) या संघांमध्ये होणार आहे...

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप २०१६ च्या कोलकाता येथे झालेल्या सामन्यात विंडीजचा धडाकेबाज अष्टपैलू कार्लोस ब्राथवेट याने बेन स्ट्रोक्सच्या अखेरच्या षटकात चार उत्तुंग षटकार खेचून विंडीजला रोमहर्षक विजयासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिले होते.

कर्णधार डेरन सॅमीच्या नेतृत्वात विंडीजने हा इतिहास रचला होता. पाच वर्षांपूवी अंतिम सामना खेळलेले दोन्ही संघ ह्यावेळी मात्र सलामीच्या सामन्यात एकमेकांशी दोन हात करणार आहेत. सराव सामन्यांमध्ये दोन्ही संघांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यातील त्यांचे प्रदर्शन कसे होणार याची उत्सुकता लागली आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com