आज WPL मध्ये डबल हेडर; कुठला संघ कुणाशी भिडणार?

आज WPL मध्ये डबल हेडर; कुठला संघ कुणाशी भिडणार?

मुंबई | Mumbai

महिला आयपीएल (WPL 2023) क्रिकेट स्पर्धेचा दुसरा हंगाम आता अंतिम टप्पयात आला आहे आज शनिवारी स्पर्धेतील दुसरा डबल हेडर सामना खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (Mumbai Indians vs UP Warriors) संघांमध्ये डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर दुपारी ३:३० वाजता होणार आहे...

महिला आयपीएलमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. संघाने ५ सामने खेळले असून ५ विजयांसह १० गुणांची कमाई करताना अव्वल स्थान कायम राखले आहे. यासह बाद फेरीतील आपले स्थानही कन्फॉर्म केले आहे.

आता युपी वॉरियर्स संघाला दुसऱ्यांदा पराभूत करून विजयी षटकार मारण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार आहे. आलिसा हिलीच्या युपी वॉरियर्स संघात आपल्या अखेरच्या सामन्यात बंगळूर संघाने पराभूत केले आहे .आता हा पराभव विसरून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी युपी वॉरियर्स सज्ज असणार आहे.

यंदाच्या महिला आयपीएलमध्ये मुंबई आणि युपी दुसऱ्यांदा समोरासमोर येत आहेत. पहिल्या साखळी सामन्यात मुंबई संघाने युपी वॉरियर्स संघाचा पराभव केला होता. याची परतफेड करण्यासाठी युपी संघाला आज चांगली संधी आहे. युपी संघाचे ५ सामन्यात २ विजय आणि ३ पराभवांसह ४ गुण आहेत स्पर्धेतील तिसऱ्या विजयासाठी युपी संघाचा इरादा असणार आहे.

आरसीबी-गुजरात आज दुसरा सामना

महिला आयपीएलमध्ये आज गुजरात जायंट्स संघाचा सामना स्मुती मंधानाच्या बंगळूर संघाशी सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे .५ सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करणाऱ्या आरसीबी संघाला अखेर सूर गवसला आहे. युपी वॉरियर्स संघाला पराभूत करून संघाने आपले विजयाचे खाते उघडले आहे. आता गुजरात संघावर मात करून आपला दुसरा सामना खिशात टाकण्यासाठी आरसीबी सज्ज असणार आहे.

आरसीबी आणि गुजरात यांच्यातील पहिल्या साखळी सामन्यात गुजरात संघाने आरसीबी संघावर मात केली होती. या पराभवाची परतफेड करण्याचा आरसीबी संघाचा प्रयत्न असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आपला अखेरचा साखळी सामना जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विजयासाठी समान संधी असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com