धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा
क्रीडा

धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बीसीसीआयकडे केली मागणी

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अनेक क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील धोनीचं कौतुक केले असून सोबतच एक मागणी देखील केली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीट करत धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे कि, “धोनी हा संपूर्ण देश आणि झारखंडचा गौरव आहे. माझ्या मते धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा. मी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित केला जावा. तसेच या सामन्याचे साक्षीदार संपूर्ण विश्व असेल. बीसीसीआयने यासाठी पुढाकार घ्यावा. या सामन्याचे आयोजन संपूर्ण झारखंड करेल”

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com