सोशल मीडियावर IPL 2022 रद्द करण्याची होतेय मागणी... काय आहे कारण?

सोशल मीडियावर IPL 2022 रद्द करण्याची होतेय मागणी... काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2022 च्या मोसमात करोनाने (COVID19) पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे (Delhi Capitals) फिजियो पॅट्रिक फरहार्ट (DC physio Patrick Farhart) यांना करोनाची (Corona positive) लागण झाली होती.

त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये करोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संपूर्ण संघाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. मिचेल मार्शची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. सोमवारी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यामुळे बुधवारी २० एप्रिल २०२२ रोजी पुण्याच्या क्रिकेट मैदानावर होणारा सामना रद्द होणार का? असा प्रश्न निर्माण झालेल्या आयपीएल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दिल्ली आणि पंजाब सामना हा ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं निश्चित झालं आहे. कारण फिजिओ पॅट्रिक फरहात वगळता संघातील इतर सर्व सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

दोन्ही संघ पुण्याच्या कॉनरॉड हॉटेलमध्ये वास्तव्य करत असून , बीसीसीआयने तेथेच बायो- बबल निर्माण केलं आहे. संघातील सर्व खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ आज मंगळवारी पुण्याला रवाना होणार आहे.

सोशल मीडियावर IPL 2022 रद्द करण्याची होतेय मागणी

दरम्यान करोना केसेस वाढत असल्याने आयपीएलचे सामने रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक नेटकाऱ्यानी IPL 2022 रद्द करावी अशी मागणी केली आहे. ट्विटरवर #CancelIPL हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

Related Stories

No stories found.