IPL-2021 : दिल्लीचा हैदराबादवर विजय

IPL-2021 :  दिल्लीचा हैदराबादवर विजय

दुबई | वृत्तसंस्था Dubai

सनराइजर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad आणि दिल्ली कॅपिटल्स Delhi Capitals यांच्यात आज IPL-2021च्या झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने विजय मिळविला.

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन्सने टॉस जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . अनरिच नॉरटीजेच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने झेल घेत हैदराबादचा सलामीवीर डेविड वॉर्नरला शून्यावर माघारी पाठविले .वृधीमान शाहने बाजू संभाळत असताना १७ धावात तंबूत परतला.

विल्यम्सन व मनीष पांडे यांनी नवव्या षटकांत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विल्यम्सनने (18) हेटमायरकडे झेल दिला. यामुळे हैदराबादची स्थिती बिकट झाली. यात केवळ एक धावेची भर घालून मनीष पांडे (17) बाद झाला.

नंतर लंदाजीसाठी आलेल्या केदार जाधवही तीन धावांवर माघारी परतला अब्दुल समद व राशीद खान यांनी 17 व्या षटकांत संघाचे शतक पूर्ण केले. समदने 2 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा काढल्या.

धाव घेण्याच्या प्रयत्नात राशीद खान 22 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर संदीप शर्माही शून्यावर धावबाद झाला. हैदराबादने 20 षटकांत 9 बाद 134 धावा करीत दिल्ली च्या संघापुढे १३५ धावांचे आव्हान ठेवले .

हैदराबादनं दिलेलं १३५ धावांचं आव्हान दिल्लीने १७.५ षटकात पूर्ण केलं. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीनं दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली.

हैदराबादचा कर्णधार केन विलियमसननं पृथ्वी शॉ चा झेल घेत अकरा धावांवर माघारी पाठविले त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर जोडीने संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.

उंच फटका मारण्याच्या नादात धवन बाद ४२ धावांवर बाद झाला. राशीद खानच्या गोलंदाजीवर अब्दुल समादनं त्याचा झेल घेतला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत ३५ धावांचे योगदान देऊन संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या खात्यात १४ गुण जमा झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com