पंजाबकिंग्ज विजयी चौकारासाठी सज्ज

पंजाबकिंग्ज विजयी चौकारासाठी सज्ज

मुंबई | Mumbai

युवा कर्णधार रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्स संघ (Delhi Capitals) आज आयपीएल १५ मध्ये पंजाबकिंग्जचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात विजय मिळवून पंजाबकिंग्जविरुद्ध (Punjab kings) विजयी हॅट्रिक करण्याच्या इराद्याने दिल्ली कॅपिटल्स आज सायंकाळी ७:३० वाजता मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियम मैदानावर उतरणार आहे....

दिल्ली संघाच्या खात्यात ५ सामन्यांमध्ये २विजय आणि ३ पराभवांसह ४ गुण आहेत. दिल्लीने गतवर्षी झालेल्या २ साखळी सामन्यांमध्ये पंजाबकिंग्जला पराभवाची धूळ चारली आहे.

पंजाबकिंग्ज संघाच्या खात्यात ६ सामन्यांमध्ये ३ विजय आणि ३ पराभवांसह ६ गुण आहेत. आयपीएल २०२२ च्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ह्या सामन्याचे आयोजन पुण्यात करण्यात येणार होते. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सामन्याचे आयोजन मुंबईत करण्यात येणार आहे.

दिल्लीवर विजय नोंदवून हैद्राबादविरुद्ध झालेला पराभव विसरून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाबकिंग्ज सज्ज आहे. हैद्राबादविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर मयंक अगरवाल आजच्या सामन्यातून संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापतीमुळे मयंक अगरवाल खेळू शकला नव्हता.

आयपीएल १५ मध्ये पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला आपल्या फलंदाजीत आणि गोलंदाजीत अधिक सुधारणा करणे आवश्यक असणार आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर वगळता दिल्ली संघाच्या एकही फलंदाजाला आपल्या कामगिरीतून सातत्य दाखवता आलेले नाही. तसेच अष्टपैलू ललित यादव , शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेलकडून फलंदाजीतून मोठी कामगिरी अपेक्षित असणार आहे.

पंजाबकिंग्ज संघाला पराभवाची मालिका खंडित करून पुन्हा विजयी ट्रॅकवर येण्यासाठी आपली रणनीती बदलावी लागणार आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा असणार आहे. विजयी संघाला आपलं आव्हान कायम राखता येणार आहे.

तर पराभूत संघाची वाट अधिक खडतर होणार आहे. लियम लिंगविस्टन , शिखर धवन , यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेरस्टोकडून संघाला मोठी खेळी अपेक्षित असणार आहे. गोलंदाजीत राहुल चाहर , कगिसो रबाडा प्रचंड फॉर्मात असून त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे असणार आहे.

स्टार परफॉर्मर्स : कगिसो रबाडा , जॉनी बेरस्टो , रिषभ पंत , पृथ्वी शॉ

Related Stories

No stories found.