DC vs CSK : दिल्लीचा चेन्नईवर रोमांचक विजय

DC vs CSK : दिल्लीचा चेन्नईवर रोमांचक विजय

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ चा (IPL 2021) 50 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 3 विकेट्सनी विजय मिळवत गुणतालिकेत पहिले स्थान गाठले आहे...

सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजी निवडली. त्यानंतर फलंदाजी करताना चेन्नईचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. केवळ अंबाती रायडूने नाबाद 55 धावा केल्या.

त्याला महेंद्र सिंह धोनीने (mahendra singh dhoni) 18 धावांची मदत केली. ज्यामुळे चेन्नईने (Chennai) केवळ 136 धावा करत दिल्लीसमोर 137 धावांचे आव्हान ठेवले होते.

दिल्लीची (Delhi) फलंदाजीही चेन्नईप्रमाणेच ढासळली. मात्र शिखरने सुरुवातीला केलेल्या 39 धावा व शिमरॉन हीटमायरच्या नाबाद 28 धावांच्या जोरावर दिल्लीने अखेर 3 विकेट्सने सामना जिंकला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com