नाशिकच्या अमिन अन्सारीला दादाश्री किताब

नाशिकच्या अमिन अन्सारीला दादाश्री किताब

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने इगतपुरी( Itagpuri) येथे आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ( District Bodybuilding Association) 'दादाश्री 2022' किताब नाशिकच्या अमिन अन्सारी (Dadashree 2022' Kitab to Nashik's Amin Ansari )याने पटकावला, तर यश दबे हा उपविजेता ठरला. इगतपुरीचा रवी भागडे हा बेस्ट पोजर विजेता तर पीयूष केदारे हा बेस्ट पोजर उपविजेता ठरला.

स्पर्धेचे उद्घाटन निवृत्ती भागडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड, खजिनदार रवींद्र वर्पे, श्रीराम जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 116 शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धा एकूण सहा वजनीगटात घेण्यात आली.प्रत्येक वजनीगटात प्रथम ते पाचव्या क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून गोपाळ गायकवाड, श्रीराम जाधव, दिनेश भालेराव, अमोल जाधव, अमन शेख यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन रवींद्र वर्षे यांनी केले.

स्पर्धेचा निकाल

55 किलो: प्रथम: चैतन्य दुबे-ए.जे.फिटनेस हब, नाशिक. द्वितीय : क्रिष्णा पिंगळे-ड्रीम फिटनेस, इगतपुरी. तिसरा : समाधान कोळी-साई फिटनेस, नाशिक.चौथा : विक्रांत मोरे-गायकवाडज् फिटझोन जिम, नाशिक. पाचवा : सूरज चव्हाण-रोबर्ट फिटनेस.

60 किलो : आकाश दुबे-ए.जे.फिटनेस हब, नाशिक. रजत इघे-स्टाऊंच फिटनेस, नाशिक.वाहिद शेख-युनिव्हर्स जिम, नाशिक. विक्की गायकर-जाणता राजा, मानवडा, जितू कातोरे-जे.के.जिम, विल्होळी.

65 किलो : रवी भागडे-ओलिम्पिया जिम, इगतपुरी. कुणाल शेलार-जाणता राजा, मानवडा.अनिल बरकले-फिटनेस क्लब, दिंडोरी.शाहरुख शेख-फिटनेस फ्लेक्स, इगतपुरी.परवेज अत्तार-ओझर फिटनेस.

70 किलो : गुलजार खान-फिटनेस फ्लेक्स, इगतपुरी. रोशन जाधव-सुयोग फिटनेस, इगतपुरी. आदर्श पवार-रोअर फिटनेस, नाशिक. समीर पवार-इंद्रजित फिटनेस, येवला. साहील शेख-मौलाबाबा जिम,नाशिक. 75 किलो : अमिन अन्सारी-फिटनेस लिगेसी, नाशिक. अशरफ कुरेशी-फिटनेस लिगेसी, नाशिक. दर्शन वाघमारे-ओझर फिटनेस. अजय निशाद-ए.जे.फिटनेस हब, नाशिक. शरद गाढवे-क्रिष्णा फिटनेस, निफाड.

75 किलोवरील : यश दबे-फिटनेस लिगेसी, नाशिक. शाहबाज शेख-मौलाबाबा जिम, नाशिक. नवनाथ बेजेकर-पार्थ फिटनेस, त्र्यंबकेश्वर. आकाश झाकणे-एकलव्य जिम, जेलरोड. पीयूष केदारे-ए.जे.फिटनेस हब, नाशिक.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com