CWG 2022 : भारताला बॅडमिंटनमध्ये दुसरे सुवर्ण, सेनचं अचूक 'लक्ष्य'

CWG 2022 : भारताला बॅडमिंटनमध्ये दुसरे सुवर्ण, सेनचं अचूक 'लक्ष्य'

मुंबई | Mumbai

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२ वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये २८ जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने धडाकेबाज कामगिरी सुवर्ण पदक पटकावलं. त्यानंतर लगेचेच भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली.

लक्ष्य सेनने बॅडमिंटन पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या ची याँग एनजीचा २१ -१९, ९-२१, १६-२१ गेममध्ये पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी

सुवर्णपदक - २०

मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन

रौप्यपदक - १५

संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर.

कांस्यपदक - २२

गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com