CWG 2022 : मराठमाेळ्या अविनाश साबळेची ऐतिहासिक ऐतिहासिक, भारतासाठी जिंकले रौप्यपदक

CWG 2022 : मराठमाेळ्या अविनाश साबळेची ऐतिहासिक ऐतिहासिक, भारतासाठी जिंकले रौप्यपदक

मुंबई | Mumbai

बर्मिंघममध्ये (Birmingham) सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Common Wealth Games 2022) मध्ये भारताच्या खेळाडूंचा जलवा पाहायला मिळत आहे. कॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक रौप्यपदक मिळाले आहे.

मराठमाेळ्या अविनाश साबळेने (Avinash Sabale) पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदक जिंकले. अविनाशने 8.11.20 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला.

तसेच भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामी (Priyanka Goswami) हिनं महिलांच्या 10 हजार मीटर रेस वॉकमध्ये अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे. या खेळाडूनं सर्वोत्तम कामगिरी करताना देशाला पदक मिळवून दिलंय.

प्रियांकानं ही शर्यत 43:38.82 मध्ये पूर्ण केली. प्रियंका गोस्वामीने या विजयासह इतिहास रचला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत (CWG 2022) पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com