IPL21 : चेन्नईसमोर सनरायझर्सचे आव्हान

IPL21 : चेन्नईसमोर सनरायझर्सचे आव्हान

नवी दिल्ली | Delhi

आयपीएल २०२१ मध्ये आज बुधवारी डेविड वॉर्नरच्या सनराईझर्स हैद्राबादसमोर एम एस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचं आव्हान असणार आहे हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

यंदाच्या हंगामात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर हा पहिलाच सामना होत आहे. येथे विजय संपादन करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

सलामी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलामी सामन्यातील ८ गड्यांनी पत्कारलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर चेन्नई सुपरकिंग्जने केकेआर , रॉयल चॅलेंजर्स बंगळूर , पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघावर दणदणीत विजय संपादन करून आयपीएल गुणतक्त्यात ८ गुणांसह दुसरे स्थान गाठलं आहे.

आता हैद्राबाद संघावर विजय मिळवून पुन्हा अव्वल स्थान गाठण्यासाठी सीएसकेने कंबर कसली आहे, तर दुसरीकडे चेन्नईवर मात करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवण्यासाठी हैद्राबाद सज्ज आहे.

चेन्नई आणि हैद्राबाद आतापर्यंत एकूण १४ सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले असून यात चेन्नईने १० सामन्यांमध्ये हैद्राबाद संघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे तर ४ सामन्यांमध्ये हैद्राबाद संघाला विजय मिळवता आला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई एक्सप्रेस सुसाट सुटली आहे.

त्यामुळे हैद्राबादविरुद्ध चेन्नईचे विजयासाठी फेव्हरेट असल्याचं चाहत्यांमध्ये बोललं जात आहे रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीमध्ये रविंद्र जडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात ताबडतोड फटकावलेल्या ३७ धावा आणि गोलंदाजीत दाखवलेली चमक आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षण यामुळे चेन्नईला ६९ धावांनी विजय संपादन करून दिला होता आता हैद्राबादविरुद्ध अशीच कामगिरी करण्यासाठी चेन्नई प्रयत्नशील असेल यात काही शंका नाही.

मात्र हैद्राबाद संघाला सामन्यापूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. स्टार गोलंदाज टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त आहेत. नटराजन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तर भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे अंतिम ११ खेळाडू निवडताना वॉर्नर अँड कंपनीला मोठी कसरत करावी लागणार आहे.

भुवनेश्वर कुमार अनफिट असल्यास बासिल थंपीचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पंजाबविरुद्ध स्टार फलंदाज मनीष पांडेला विश्रांती देण्यात आली होती. तो संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. शिवाय दिल्लीविरुद्ध मोक्याच्या क्षणी झळकावलेल्या झुंजार अर्धशतकामुळे केन विल्यमसनने सामना टाय करण्यात निर्णयक भूमिका बजावली होती,

मात्र सुपर ओव्हरमध्ये हैद्राबादला दिल्लीने पराभूत केले होतं हा पराभव मागे सारून नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी हैद्राबाद सज्ज आहे दोन्ही संघांची तुलना केल्यास दोन्ही संघांमध्ये अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे हा सामना म्हणजे चेन्नईची फलंदाजी विरुद्ध हैद्राबादची गोलंदाजी असा रंगण्याची शक्यता आहे

-सलिल परांजपे, नाशिक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com