IPL 2022 : आज शेवटचा डबल हेडर; 'हे' चार संघ भिडणार

IPL 2022 : आज शेवटचा डबल हेडर; 'हे' चार संघ भिडणार
File Photo

मुंबई | Mumbai

लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाचा सामना आज सायंकाळी ७:३० वाजता संजू सॅम्सनच्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाशी होणार आहे...

आयपीएल गुणतालिकेत लखनऊ सुपरजायंट्स संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ संघाला बाद फेरी निश्चित करण्यासाठी संघाला आज विजय अनिवार्य असणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघाच्या खात्यात १२ सामन्यांमध्ये १४ गुण आहेत. बाद फेरी निश्चित करण्यासाठी राजस्थान संघाला आज विजयाची गरज आहे. तर पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघांमध्ये आज रविवारी दुपारी ३:३० वाजता होणार आहे. बाद फेरीत आपलं स्थान निश्चित केलेला गुजरात टायटन्स (GT) अव्वल स्थान कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.

File Photo
Visual Story : ११ वर्षानंतर शर्मिला टागोर बॉलिवूडमध्ये; 'या' चित्रपटात झळकणार

तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्स (CSK) बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. हा सामना चेन्नई संघासाठी निव्वळ एक औपचारिकता असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आयपीएल २०२२ ची (IPL 2022) विजयी सांगता करण्यासाठी चेन्नई आज मैदानात उतरणार आहे.

File Photo
Visual Story : राज ठाकरेंना दुबईवरून धमकीचा फोन आला अन्...

राजस्थान आणि लखनऊ सामन्यात जोस बटलर, संजू सॅमसन, ट्रेंट बोल्ट, लोकेश राहुल, क्विंटन डिकॉक हे स्टार प्लेअर्स असतील. तर चेन्नई विरुद्ध गुजरातच्या सामन्यात रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, धोनी, हार्दिक पंड्या, डेविड मिलर हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.