भारतीय संघाला धक्का; आता 'हा' खेळाडू करोना पॉझिटिव्ह

भारतीय संघाला धक्का; आता 'हा' खेळाडू करोना पॉझिटिव्ह

मुंबई । Mumbai

भारत आणि इंग्लंड (India & England) यांच्यातील एकमेव कसोटी सामना (test match) १ जुलैपासून सुरू होणार असून याआधी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला करोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. शनिवारी त्याच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीबीसीसीआयने (BCCI) ट्विट करत दिली आहे.

बीबीसीसीआयने (BCCI) ट्विट करत म्हटले आहे की, 'भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला करोनाची लागण झाली आहे. सध्या रोहित भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रविवारी रोहितची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल. तसेच रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

दरम्यान, भारतीय संघ १६ जूनला इंग्लंडला रवाना झाला होता. मात्र त्यावेळी संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संघासोबत गेला नव्हता. तसेच गेल्या आठवड्यात लंडनला पोहोचलेल्या विराट कोहलीलाही (Virat Kohli) करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र सध्या हे दोन्ही खेळाडू ठीक असून भारतीय संघासोबत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com