
मुंबई | Mumbai
ऋषभ पंतचा उत्तराखंडमधील रुरकी येथे भीषण अपघात झाला. यानंतर पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतच्या गुडघ्यात फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्या कपाळावर टाके पडले आहेत. हाताला आणि पाठीलाही दुखापत झाली आहे. दरम्यान ऋषभ पंतच्या हेल्थबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
ऋषभ पंतविषयी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. DDCA पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार आहे. त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर इथे उपचार केले जातील. डीडीसीएचे संचालक श्यान शर्मा म्हणाले- क्रिकेटपटू ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आहे.
३० डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंत यांच्यावर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पंतला मुंबईतील नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
बीसीसीआयने मंगळवारी (३ जानेवारी) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये प्रशिक्षक आणि संघातील सदस्यांनी पंतचे फायटर असे वर्णन केले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाने ऋषभ पंतला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दिक पंड्यासह संघातील इतर खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी पंतला व्हिडीओ संदेश पाठवला आहे. बीसीसीआयने मंगळवारी (३ जानेवारी) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये कोच आणि संघातील सदस्यांनी पंतचे फायटर असे वर्णन केले आहे.