IPL 2023 : आज RCB आणि KKR यांच्यात लढत, कुणाचे पारडे जड?

IPL 2023 : आज RCB आणि KKR यांच्यात लढत, कुणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai

IPL मध्ये आज (26 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आमनेसामने असतील. हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने मागील दोन लढतींत पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्सला पराभूत केल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल. आता त्यांचे लक्ष्य विजयाची हॅट्‌ट्रिकचे असेल. कोलकता नाईट रायडर्सला सलग पाचवा तर एकूण सहावा पराभव टाळावा लागणार आहे. मागील चारही लढतींमध्ये त्यांच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली आहे.

IPL 2023 : आज RCB आणि KKR यांच्यात लढत, कुणाचे पारडे जड?
आता एकाच नंबरवरून चालणार चार मोबाईलमध्ये WhatsApp... कसं सुरू करायचं?

यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने आरसीबीचा दारुण पराभव केला होता. कोलकात्याच्या फिरकी गोलंदाजांपुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली होती. हा सामना कोलकात्याने जिंकला होता. पण आता बेंगलोरच्या मैदानावर आरसीबी पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. यामध्ये कोलकाता संगाचे पारडे थोडे जड दिसतेय. कोलकाता संघाने आतापर्यंत 17 सामन्यात बाजी मारली आहे. तर आरसीबीने संघाने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघ विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत.

IPL 2023 : आज RCB आणि KKR यांच्यात लढत, कुणाचे पारडे जड?
"अजित पवारांचे बॅनर अन् संजय राऊतांचं भाकीत" यावर शरद पवार काय म्हणाले?

आयपीएल सुरू झाल्यापासून राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत प्रथम क्रमांक मिळवलेला होता. चेन्नई सुपरकिंग्जने सलग दोन सामने जिंकत राजस्थानला पछाडत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्यानंतर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत आयपीएलच्या गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. आरसीबी पाचव्या क्रमांकावर असून केकेआर आठव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळं आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com