
मुंबई | Mumbai
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा निकाल लावण्याआधीच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना निकाली निघाल्यानंतर डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याच्या चित्र स्पष्ट झाले. अंतिम सामन्यात आता ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ आमने सामने असतील.
श्रीलंकेला न्यूझीलँडविरुद्धची दोन सामन्यांची मालिका काहीही करून २-० ने जिंकायची होती. मात्र पहिल्याच सामन्यात किवीने श्रीलंकेचा पराभव केला. त्यामुळे श्रीलंकेची आयसीसी गुणतालिकेत घसरण झाली आणि भारतानं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे.
या सामन्यात किवी संघाचा दमदार फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियम्सने नाबाद १२१ धावांची दमदार इनिंग खेळली. अखेरच्या षटकात न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाला मोठा दिलासा आहे.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा कसोटी सामना वनडे आणि टी-२० सामन्यापेक्षा कमी नव्हता. कारण हा सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला. पण किवी फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसनने शानदार शतक झळकावले.
भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे, हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ ते ११ जून या कालावधीत होणार आहे. सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.