विराटने ३ वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक

विराटने ३ वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक

अहमदाबाद | Ahmedabad

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघही या आव्हानाचा जोमाने पाठलाग करत आहे.

मात्र, यादरम्यान भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील विराटचे ७५ वे शतक आहे. विशेष म्हणजे जवळपास ३ वर्षानंतर म्हणजे १२०४ दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं आहे.

विराटने ३ वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक
धक्कादायक! शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ Video व्हायरल

याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर २०१९ मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च २०२३ मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ ५ चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्यानं आज ठोकलेला नाही.

विराटने ३ वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक
समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! कार पलटी होऊन २ मुलांसह ३ महिलांचा जागीच मृत्यू

विराटने २० जून २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हा पासून कोहलीने आतापर्यंत भारतीय संघासाठी १०८ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ४८ च्या सरासरीने ८३२८ धावा केल्या आहेत. यामध्ये २८ शतके, ७ द्विशतके आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने या कालावधीत कसोटीत ९३१ चौकार आणि २४ षटकारही मारले आहेत.

विराटने ३ वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक
पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? महिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं अन्...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com