स्पर्धेआधीच भारताच्या सात खेळाडूंना करोना

स्पर्धेआधीच भारताच्या सात खेळाडूंना करोना
करोना अपडेट

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतात करोना (Corona) रूग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका आता इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेला (India Open Badminton Championships) बसला आहे. करोनामुळे भारताचे सात स्टार बॅडमिंटनपटू स्पर्धेपासून वंचित राहणार आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (Badminton World Federation) भारताचे सात खेळाडू करोनाबाधित असल्याचे वृत्त दिले आहे. मात्र करोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावे अद्याप उघड केली नाहीत...

फेडरेशनच्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी आरटी-पीसीआर चाचणीसाठी गेलेल्या काही खेळाडूंचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सात खेळाडूंच्या जवळच्या संपर्कात आलेल्या दोन जोड्यांनाही स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. प्रतिस्पर्ध्यांना पुढील फेरीत वॉकओव्हर दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मनू अत्री, बी साई प्रणीत आणि ध्रुव रावत यांची करोना अहवाल पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताला (India) धक्का बसला होता.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (Badminton Association of India) आयोजित इंडिया ओपन 2022 (India Open 2022) ही स्पर्धा इंदिरा गांधी स्टेडियमच्या केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये आयोजित करण्यात येत आहे. करोना नियमांनुसार हॉटेल आणि स्टेडियमच्या बाहेर दररोज सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांची करोनासाठी चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, किदाम्बी श्रीकांतसह सात खेळाडूंची करोनाचाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com