CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिलं पदक, मराठमोळ्या संकेत महादेव सारगरची कामगिरी

CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिलं पदक, मराठमोळ्या संकेत महादेव सारगरची कामगिरी

दिल्ली | Delhi

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पहिलं पदक मिळवलं आहे. महाराष्ट्राचा सुपूत्र संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. त्याने एकूण २४८ किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले.

सांगली जिल्ह्यातील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी संकेत सरगर याची बर्मिंगहॅम (इंग्लड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघामध्ये निवड झाली होती.

वेटलिफ्टिंगमध्ये अशी निवड होणारा संकेत महाराष्ट्रातील पहिला खेळाडू होता. आता त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदक पटकावून सांगलीचे तसेच महाराष्ट्राचे नाव उंचावले.

संकेतने स्नॅच प्रकारात ११३ तर क्लीन अँड जर्कमध्ये १३५ किलो वजन उचलून त्याने ही कामगिरी केली. संकेत दुखापत झाली असतानाही १४१ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही प्रयत्न फसला. अखेर मोहम्मद अनिकने संकेतपेक्षा फक्त १ किलो जास्त वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com