IPL 2023 : "आता यु टर्न नाही.." ; अंतिम सामन्याआधीच अंबाती रायडूने घेतला महत्वाचा निर्णय

IPL 2023 : "आता यु टर्न नाही.." ; अंतिम सामन्याआधीच अंबाती रायडूने घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई | mumbai

महेंद्रसिंग धोनीची आज शेवटची आयपीएल मॅच असल्याच्या शक्यतेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने CSK फॅन्स आले आहेत. त्यामुळे यजमान गुजरात टायटन्सपेक्षा CSKच्या पिवळ्या जर्सीतील समर्थकच मोठ्या संख्येने दिसत आहेत. धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडू याने निवृत्तीची घोषणा केली आहे. अंबाती रायडू याने ट्वीट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. ३८ वर्षीय रायुडूने ट्विट केले की, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन ग्रेट संघांसोबत, १४ हंगामात २०४ सामने,११ प्ले ऑफ, ८ फायनल अन् ५ ट्रॉफी... आशा करतो की आज सहावी जिंकू.. हा प्रवास अविस्मरणीय होता. आजच्या फायनलनंतर मी आयपीएल खेळणार नसल्याचा निर्णय गेतला आहे. या स्पर्धेत खेळण्याचा मी मनसोक्त आनंद घेतला. सर्वांचे आभार,, यावेळी यू टर्न नाही...

तत्पुर्वी, २००२ मध्ये १६ वर्षांचा असताना त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध १७७ धावांची खेळी केली होती. २०११ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. २०१४ मध्ये त्याला MI ने पुन्हा संघात घेतले. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात आला. त्याने एकूण २०३ सामन्यांत ४३२९ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व २२ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१८ च्या पर्वात त्याने १६ सामन्यांत ४३ च्या सरासरीने ६०० धावा चोपून CSKच्या जेतेपदात मोठा वाटा उचलला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com