IPL 2022, CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्स आज जिंकणार का?

IPL 2022, CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्स आज जिंकणार का?

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) ४ सामन्यांमध्ये पराभूत झालेला चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आज सायंकाळी ७:३० वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (Royal Challengers Bangalore) सामना करणार आहे....

आजच्या सामन्यात विजय संपादन करून सलग ४ सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करून पहिला विजय मिळवण्यासाठी चेन्नई (CSK) आज मैदानात उतरणार आहे.

बाद फेरीच्या शर्यतीत चेन्नई संघाला १० सामन्यांमध्ये ७ किंवा ८ सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे. पुढील सर्व सामने चेन्नईसाठी करा वा मरा असणार आहे.

तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. सलामी सामन्यात पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर संघाने मुंबई इंडियन्स (MI), कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) संघावर विजय मिळवून जबरदस्त कमबॅक केले आहे. मात्र आता चेन्नईविरुद्ध लढतीपूर्वी बंगळूर संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

स्टार गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) आपल्या वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्याजागी कोणाला संधी मिळणार? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत विजयी चौकार मारून ८ गुणांसह अव्वल स्थान गाठण्यासाठी बंगळूर संघाला आज विजयाची गरज आहे.

२०१८ पासून झालेल्या ८ सामन्यांमध्ये चेन्नईने ६ तर बंगळूरने २ विजय मिळवले आहेत. चेन्नई संघाला मागील सामन्यांमध्ये सुमार फलंदाजी आणि सुमार गोलंदाजीचा फटका बसला आहे.

शिवाय रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड यांच्याकडून संघाला चांगली सुरुवात अपेक्षित आहे. हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात संथ सुरुवातीनंतर चेन्नई संघाला धावफलकावर मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती.

पण झटपट विकेट्स पडत गेल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. दुखापतग्रस्त स्टार गोलंदाज दीपक चाहरची अनुपस्थिती मागील ४ सामन्यांमध्ये चेन्नईला प्रकर्षाने जाणवली आहे. तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, रविंद्र जडेजा; ब्रावोकडून संघाला चांगली कामगिरी अपेक्षित आहे. आजच्या सामन्यातील स्टार परफॉर्मर्स धोनी, फाफ डू प्लेसिस , विराट कोहली असणार आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com