चेन्नईसमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान

चेन्नईसमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान

मुंबई | Mumbai

आयपीएल १५ (IPL15) मध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा सामना ४ वेळचे आयपीएल विजेते चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाशी सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. हा सामना मुंबईच्या सीसीए ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल... (CCA Brabourne Stadium Mumbai)

आजच्या सामन्यात विजय मिळवून आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स (RR) सज्ज असणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाच्या तुलनेत सरस राहिली आहे.

चेन्नई संघावर मात करून बाद फेरीत आत्मविश्वासाने दाखल होण्यासाठी राजस्थान (Rajasthan) आजच्या सामन्यात विजय संपादन करण्याचा प्रयत्न करणार आहे. चेन्नई संघासाठी आजचा सामना निव्वळ एक आत्मसन्मानाची लढाई असणार आहे.

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दोन्ही संघांमध्ये हा पहिला सामना होणार आहे. आयपीएल २०२० (IPL 2020) पासून मागील ४ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास राजस्थान संघाचे पारडं चेन्नईवर जड राहिले आहे. राजस्थान रॉयल्स संघाने ३ तर चेन्नईला केवळ १ विजय संपादन करता आला आहे. यंदाच्या हंगामात तुफान फॉर्मात असलेला राजस्थान रॉयल्स संघाच्या गाडीला ब्रेक लावण्यात चेन्नई यशस्वी होणार का ? यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.

तसेच आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत एकूण २५ वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यात चेन्नईने १५ तर राजस्थान संघाने १० विजय नोंदवले आहेत. तसेच आजच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोर जॉस बटलर (Joss Butler) आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांना लवकरात लवकर बाद करणे हे कडवे आव्हान असणार आहे.

दरम्यान, चेन्नईला राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करायचे असेल तर सॅमसन आणि जॉस बटलरवर सुरुवातीपासूनच अंकुश ठेवणे आवश्यक असणार आहे. आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) , एमएस धोनी (MS DHONI) जॉस बटलर (Joss Butler) संजू सॅमसन (Sanju Samson) हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com