IPL 2022, CSK vs PBKS : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई सज्ज

IPL 2022, CSK vs PBKS : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई सज्ज

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज सोमवारी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाबकिंग्ज (Punjab Kings) संघात सामना सायंकाळी ७:३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे....

बाद फेरीत आपलं स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने दोन्ही संघाना विजय अनिवार्य असणार आहे. सलगच्या पराभवांमुळे चेन्नई (CSK) संघावर आयपीएल १५ मधून पॅकअपच सावट आहे.

पंजाबकिंग्जविरुद्ध (PBKS) सामन्यात चेन्नईला विजयासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. आजच्या सामन्यात विजय संपादन करून स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवण्यासाठी चेन्नई सज्ज आहे.

दि. ३ एप्रिल २०२२ रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबकिंग्जने चेन्नईचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई आज मैदानात उतरणार आहे. तर पंजाबकिंग्ज (PBKS) संघाची नजर दुसऱ्यांदा चेन्नईवर मात करण्यावर लागली आहे.

IPL 2022, CSK vs PBKS : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई सज्ज
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी; 'या' भागात उष्णतेची लाट

पंजाबकिंग्ज (PBKS) ६ गुणांसह आठव्या तर चेन्नई ४ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यातील विजयासह बाद फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी चेन्नई सज्ज असणार आहे.

आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि पंजाबकिंग्ज (Punjab Kings) यांच्या आजवरच्या कामगिरीवर एक नजर टाकल्यास चेन्नईचे पारडे कायमच पंजाबविरुद्ध जड राहिले आहे.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ सामने खेळवले गेले आहेत. यात चेन्नईने १६ तर पंजाबने ११ सामन्यांमध्ये विजय साकारला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नईची कामगिरी पंजाबकिंग्जच्या तुलनेत खराब राहिली आहे.

चेन्नई संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा अपयशी ठरत आहे. त्याला आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

IPL 2022, CSK vs PBKS : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई सज्ज
मलेरिया कशामुळे होतो? जाणून घ्या सविस्तर या आजाराविषयी...

तसेच अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो फलंदाजीतून आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. मात्र त्याची उणीव त्यानं आपल्या गोलंदाजीतून भरून काढली आहे. त्याने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये १२ विकेटस काढल्या आहेत.

पंजाबकिंग्जने यंदाच्या आयपीएलमधील आपली घोडदौड कायम राखली आहे. मात्र सलामीवीर शिखर धवन, जॉनी बेरस्टो आणि लियम लिंगविस्टनकडून मोठी खेळी संघाला अपेक्षित आहे.

IPL 2022, CSK vs PBKS : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी चेन्नई सज्ज
राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा कट; गृहमंत्री नाशकात कडाडले

लिंगविस्टनने आतापर्यंत संघासाठी २०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधार मयंक अगरवाल अद्याप एकच अर्धशतक झळकावू शकला आहे.

अष्टपैलू ओडिन स्मीथ, शाहरुख खान अद्याप मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरत आहेत. हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत राहुल चाहर वगळता एकाही गोलंदाजाने प्रभावित केलेलं नाही. आजच्या सामन्यातील शिखर धवन, मयंक अगरवाल, लियम लिंगविस्टन, धोनी आणि ऋतुराज गायकवाड हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.