'अर्शदीप सिंह' प्रकरणी केंद्र सरकारकडून विकीपीडियाला समन्स; नेमकं काय आहे प्रकरण?

'अर्शदीप सिंह' प्रकरणी केंद्र सरकारकडून विकीपीडियाला समन्स; नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा (IND vs PAK) आशिया चषक २०२२ मधील सुपर-४ मधील सामना ५ विकेट्सने गमावला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.५ षटकात ५ विकेट्स शिल्लक असताना सामना जिंकला.

दरम्यान या सामन्यात अटीतटीच्या क्षणी भारताचा युवा जलद गोलंदाज अर्शदीप सिंहकडून (Arshdeep Singh) एक सोपा कॅच सुटला. यानंतर भारताने सामना गमावला. अर्शदीप सिंहच्या या चुकीनंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. इतक नाही तर सोशल मीडियावर तो ट्रोल देखील झाला.

धक्कादायक म्हणजे विकीपीडियावरील (Wikipedia) अर्शदीप सिंगच्या पेजवर काही बदल करण्यात आले आणि त्याचे आणि खलिस्तान (Khalistani) संघटनेशी संबंध असल्याचे म्हटले गेले. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics & IT) विकीपीडियाला समन्स बजावलं आहे. (The Ministry of Electronics & IT today summoned executives from Wikipedia)

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहिती कशी बदलली गेली, याबाबत विचारणा करत समन्स बजावलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तानी लिंक भारतामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे असंतोषाची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. पृष्ठातील बदलामुळे अर्शदीप सिंगच्या कुटुंबासाठी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हंटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com