
मुंबई | Mumbai
टी20 विश्वचषक 2022 च्या स्पर्धेनंतर अनेक भारतीय खेळाडूंना विश्रांती दिली गेली. यामुळे न्यूझीलंड दौऱ्यास विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन इत्यादी मुकले.
आता भारत बांगलादेशच्या दौऱ्यावर असून यामध्ये तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरूवात 4 डिसेंबरपासून होणार असून त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर शमीच्या जागी उमरान मलिकचा वनडे मालिकेसाठी बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.