टी-२० पाठोपाठ वन डे संघाचंही कर्णधारपद रोहित शर्माकडे

टी-२० पाठोपाठ वन डे संघाचंही कर्णधारपद रोहित शर्माकडे

दिल्ली l Delhi

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) आता टी-20 नंतर भारतीय वनडे (ODI) संघाचा कर्णधारपदी विराजमान होणार आहे. बीसीसीआयने रोहितला वनडे कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आज निवड समितीची बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

टी२० विश्वचषकानंतर विराट कोहली याने टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर, उपकर्णधार रोहित शर्माची त्याच्या जागी नियमित टी२० कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली होती. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत ३-० असा विजय मिळवलेला.

गेल्या काही वर्षांत इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारख्या क्रिकेट संघांनी मर्यादीत षटकांसाठी आणि कसोटी संघासाठी वेगवेगळ्या नेतृत्व निवडीला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात या स्प्लिट कॅप्टन्सीला भारतात विरोध झाला. पण टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघही या मार्गावर जाण्यास तयार झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आता वनडेत रोहित राज्य आल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत कोहली नसताना जेव्हा रोहितने भारताचे नेतृत्व केले आहे, तेव्हा रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने दिमाखदार कामगिरी केल्याचे समोर आले आहे.

पण आता रोहितकडेच भारताच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद आता सोपवण्यात आले आहे. त्यामुळे रोहित आता भारतीय संघाचे कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. दुसरीकडे विराट कोहलीला हा मोठा धक्का असेल. कारण कोहलीचे भारतीय संघातील संस्थान आता खालसा होणार असल्याचे संकेत मिळायला लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com