
देवळा | वार्ताहर | Deola
राष्ट्रीय बॉलबॅडमिंटन (Ball Badminton) स्पर्धेत देवळा पब्लिक स्कुलचा अष्टपैलू खेळाडू भावेश सूर्यवंशी याने राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक प्राप्त केले आहे. क्रिडा व युवा सेवा संचालनालय, पुणे बॉलबॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आदेशान्वये तेलंगणा राज्य सब ज्युनियर राष्ट्रीय बॉलबॅडमिंटन स्पर्धा (Junior National Ball Badminton Tournament) मच्युरियल (तेलंगणा) येथे नुकतीच संपन्न झाल्या.
या स्पर्धेत देवळा पब्लिक स्कूलचा (Deola Public School) अष्टपैलू खेळाडू भावेश सूर्यवंशी व महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्रला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक प्राप्त करून दिले.
राष्ट्रीय खेळाडू भावेश सूर्यवंशीचे (Bhavesh Suryavanshi) आज (दि.४ रोजी) पब्लिक स्कुल देवळा शाळेत आगमन होताच देवळा गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव व सर्व शिक्षक, कर्मचारी व खेळाडू यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी के. डी. पाटील, एस. जी. शिंदे, यु. व्ही. सावकार, पी. बी. ह्याळीज, अमोल कुवर, श्रीम.ए. बी. शिंदे, श्रीम. आर. एस. काकडे, प्रविण गुंजाळ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे आदी उपस्थित होते.